Kopargaon water problem : ४० वर्षांचा ‘दुष्काळ’ आशुतोष काळेंनी संपवला; आता श्रेयवादासाठी विवेक कोल्हेंचे ‘पाणी चोर’ म्हणण्याचे खालच्या पातळीवरचे राजकारण!

Kopargaon water problem

Kopargaon water problem कोपरगाव: कोपरगाव शहराचा सर्वात जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आशुतोष काळे यांनी मार्गी लावला असताना, भाजप नेते विवेक कोल्हे मात्र या कामाचे श्रेय घेण्याऐवजी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका करत असल्याचे चित्र समोर आले आहे. सत्तेत असताना ४० वर्षे ज्यांना शहराला पाणी देता आले नाही, तेच आता ज्यांनी पाणी आणले त्यांना ‘पाणी चोर’ संबोधून जनतेची दिशाभूल करत असल्याचा संताप नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

४० वर्षांचा अनुशेष आणि आशुतोष काळेंचे ‘नियोजन’
कोपरगावमध्ये कोल्हे गटाची ४० वर्षे सत्ता होती. या काळात कोपरगावकरांना महिना-महिना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरावे लागत होते. मात्र, आमदार आशुतोष काळे यांनी सत्तेत आल्यावर हा प्रश्न गांभीर्याने घेतला. ५ नंबर साठवण तलावाच्या माध्यमातून त्यांनी शहराचा पाण्याचा प्रश्न कायमचा निकाली काढला. आज कोपरगावकरांना नियमित पाणी मिळत आहे, हे केवळ काळेंच्या प्रयत्नांमुळे शक्य झाले आहे. मात्र, हे यश पचवणे विवेक कोल्हे यांना कठीण जात असल्याचे दिसत आहे.

पाणी देणाऱ्याला ‘पाणी चोर’ म्हणणे हा कोपरगावकरांचा अपमान!
विवेक कोल्हे यांनी नुकत्याच एका सभेत आशुतोष काळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना ‘पाणी चोर’ म्हणून हिणवले. ज्यांनी तलाव बांधून कोपरगावची तहान भागवली, त्यांनाच अशा शब्दांत अपमानित करणे म्हणजे कोपरगावच्या जनतेचा अपमान आहे. ४० वर्षे सत्ता असताना कोल्हेंनी स्वतःच्या कारखान्यासाठी आणि फायद्यासाठी पाण्याचे नियोजन केले, मात्र शहराला तहानेले ठेवले. आता जेव्हा आशुतोष काळेंनी तो प्रश्न सोडवला, तेव्हा कोल्हे केवळ राजकीय द्वेषापोटी अशी विधाने करत आहेत.

चुकीची माहिती पसरवून जनतेला ‘मूर्ख’ बनवण्याचा प्रयत्न
विवेक कोल्हे हे आपल्या सभेत कागदपत्रे दाखवून विरोधकांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, वास्तव हे आहे की त्यांनी सत्तेत असताना शहराच्या पाणीपुरवठा योजनेसाठी कधीही ठोस पावले उचलली नाहीत. काळे यांनी केलेल्या तलावाच्या कामाला ‘पाणी चोरी’ म्हणणे म्हणजे निव्वळ हास्यास्पद आहे. कोपरगावच्या ७५ किलोमीटरच्या रस्त्यांवर कधीही न फिरणारे कोल्हे आता केवळ निवडणुकीसाठी सक्रिय झाले असून, ते जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप कोयते पिता-पुत्रांनी देखील केला आहे.

कोपरगावकर आता सत्तेचा हिशोब मागणार!
४० वर्षे सत्तेची ऊब भोगूनही ज्यांनी पाण्याचा टँकरमुक्त कोपरगाव करू शकले नाही, अशांना आता आशुतोष काळेंच्या कामावर बोलण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. काळे यांनी केवळ ५ नंबर तलावच नाही, तर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी काम केले आहे. विवेक कोल्हे यांच्याकडे स्वतःचा कोणताही विकास आराखडा नसल्याने ते केवळ वैयक्तिक टीका आणि जुन्या खटल्यांचे कागद नाचवून लोकांचे लक्ष मूळ प्रश्नांवरून विचलित करत आहेत.

कोपरगावची जनता आता ‘पाणी आणणारा नेता’ आणि ‘केवळ आश्वासन देणारा नेता’ यातील फरक ओळखून आहे. निवडणुकीच्या तोंडावर कोल्हेंनी सुरू केलेले हे ‘दिशाभूल’ करण्याचे राजकारण त्यांना महागात पडणार, हे आता निश्चित झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!