प्रभाग क्रमांक २ मध्ये विकासाचा विश्वास; राहुल शिरसाठ व स्मिता साबळेंना नागरिकांची वाढती पसंती

कोपरगाव | प्रतिनिधी
प्रभाग क्रमांक दोनमध्ये राहुल चंद्रहंस शिरसाठ आणि स्मिता शैलेश साबळे यांच्या सातत्यपूर्ण व थेट जनसंपर्कामुळे नागरिकांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. घराघरात जाऊन समस्या समजून घेणे, त्यावर तत्काळ पाठपुरावा करणे आणि सर्वसामान्य नागरिकांशी असलेली आपुलकीची नाळ यामुळे दोघांनाही प्रभागात चांगला प्रतिसाद मिळत आहे.

यासोबतच आमदार आशुतोष दादा काळे यांच्या माध्यमातून प्रभागात राबविण्यात आलेल्या विकासकामांचा थेट फायदा नागरिकांना होत असल्याने, त्या कामांचा विश्वास राहुल शिरसाठ व स्मिता साबळे यांच्या रूपाने व्यक्त होताना दिसत आहे. रस्ते, पाणीपुरवठा, वीज, स्वच्छता व मूलभूत सुविधांच्या प्रश्नांवर झालेले ठोस काम नागरिकांच्या मनात ठसा उमटवत आहे.

“फक्त आश्वासन नव्हे तर प्रत्यक्ष काम दिसत आहे,” अशी भावना अनेक नागरिकांकडून व्यक्त होत असून, विकासाच्या या प्रवाहाला साथ देण्यासाठी प्रभाग क्रमांक दोनमधील मतदार राहुल शिरसाठ व स्मिता साबळे यांच्याकडे सकारात्मक नजरेने पाहत आहेत.

प्रभागात निर्माण झालेला हा विश्वास व उत्साह पाहता, आगामी निवडणुकीत विकासाला प्राधान्य देणाऱ्या नेतृत्वाला जनतेचा कौल मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!