प्रभाग 3 मधी लोकांच्या विश्वासाचे उमेदवार ठरतात निर्मला सोमनाथ आढाव व जनार्दन सुधाकर कदम

कोपरगाव नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभागातील नागरिकांमध्ये निर्मला सोमनाथ आढाव व जनार्दन सुधाकर कदम यांच्याबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. नागरिकांच्या अडीअडचणीत प्रत्यक्ष उभे राहत, त्यांनी वेळोवेळी लोकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.

पाणीपुरवठा, रस्ते दुरुस्ती, वीज, स्वच्छता तसेच दैनंदिन नागरी समस्यांसाठी नागरिकांनी केलेल्या तक्रारी तात्काळ संबंधित विभागांपर्यंत पोहोचवून त्यावर मार्ग काढण्यात आढाव व कदम यांनी सक्रिय भूमिका बजावली आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये त्यांच्याबाबत विश्वास वाढताना दिसत आहे.

आमदार आशुतोष दादा काळे यांच्या माध्यमातून प्रभागात विविध विकासकामांना गती मिळाली असून, या कामांचा थेट फायदा नागरिकांना झाला आहे. विकासकामांसाठी सातत्याने पाठपुरावा, प्रशासकीय पातळीवर समन्वय आणि जनतेशी थेट संवाद हे या दोघांचे वैशिष्ट्य ठरत आहे.

याच कार्यपद्धतीमुळे आता प्रभागातील अनेक नागरिक “नगरसेवक म्हणून आम्हाला निर्मला आढाव व जनार्दन कदम हेच हवेत” अशी भूमिका मोकळेपणाने व्यक्त करत आहेत. जनसंपर्क, कामाची तळमळ आणि विकासाभिमुख दृष्टिकोन यांच्या बळावर हे दोघेही लोकांच्या विश्वासाचे उमेदवार ठरत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!