कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक सातमध्ये विकासाच्या मुद्द्यावर स्पष्ट जनमत तयार झाले आहे. आमदार आशुतोष दादा काळे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे प्रभागात विविध विकासकामांना गती मिळाली असून, त्या कामांची प्रभावी अंमलबजावणी प्रतिभा सुनील शिलेदार व गौरी मंदार पहाडे यांच्या माध्यमातून झाली आहे.
रस्ते, पाणीपुरवठा, गटार व्यवस्था, स्वच्छता, सार्वजनिक सुविधा तसेच नागरिकांच्या दैनंदिन प्रश्नांवर दिलेला ठोस पाठपुरावा यामुळे प्रभागातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. “काम करणाऱ्या नेतृत्वालाच पुन्हा संधी” देण्याची भूमिका मतदारांनी घेतली असून, त्यामुळेच या दोन्ही उमेदवारांना पुन्हा एकदा स्पष्ट कौल मिळताना दिसत आहे.
एकीकडे आमदार आशुतोष दादा काळे यांची भक्कम साथ आणि दुसरीकडे प्रत्यक्षात उतरलेली विकासकामे — या दुहेरी विश्वासामुळे प्रभाग क्रमांक सात मधून शिलेदार व पहाडे यांचा विजय निश्चित मानला जात आहे.



