प्रभाग क्रमांक ९ : सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या सागर निंबा आहेर व अंजना गंगाधर फडे यांना मिळतोय जनतेचा कौल

कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक नऊमध्ये सामाजिक बांधिलकी जपणारे उमेदवार सागर निंबा आहेर व अंजना गंगाधर फडे यांना जनतेचा वाढता पाठिंबा मिळताना दिसत आहे.

प्रभागातील नागरिकांच्या अडचणी, सामाजिक प्रश्न आणि दैनंदिन गरजांसाठी दोघांनीही सातत्याने केलेल्या कार्यामुळे त्यांच्याविषयी विश्वास निर्माण झाला आहे. आरोग्य, स्वच्छता, गरजू घटकांना मदत तसेच नागरी सुविधांसाठी घेतलेला पुढाकार नागरिकांच्या मनात सकारात्मक ठसा उमटवत आहे.

प्रचारादरम्यान मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता, विकासाभिमुख व समाजाभिमुख नेतृत्व म्हणून मतदारांचा कौल सागर आहेर व अंजना फडे यांच्या बाजूने स्पष्टपणे झुकताना दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!