कोपरगाव नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ११ मध्ये विकासाला प्राधान्य देणाऱ्या नेतृत्वाला नागरिकांची स्पष्ट पसंती मिळताना दिसत आहे. या प्रभागातून सोनम त्रिभुवन व शुभम काळे यांना सर्वच स्तरांतून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, यामागे आमदार आशुतोष दादा काळे यांनी प्रभागात केलेली भरीव विकासकामे आणि त्यामागील दूरदृष्टीपूर्ण व्हिजन हे प्रमुख कारण ठरत आहे.
गेल्या काही वर्षांत प्रभाग क्रमांक ११ मध्ये रस्ते, ड्रेनेज, पाणीपुरवठा, वीज, स्वच्छता तसेच नागरी सुविधांच्या दृष्टीने लक्षणीय बदल झाला आहे. दीर्घकाळ प्रलंबित असलेली कामे मार्गी लागली असून, नागरिकांच्या दैनंदिन अडचणी कमी झाल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे. “विकास बोलका नसतो, तो दिसतो” हेच चित्र सध्या या प्रभागात पाहायला मिळत आहे.
सोनम त्रिभुवन व शुभम काळे हे दोघेही स्थानिक पातळीवर सातत्याने जनसंपर्क ठेवत असून, नागरिकांच्या प्रश्नांबाबत संवेदनशील भूमिका घेत आहेत. आमदार आशुतोष दादा काळे यांच्या मार्गदर्शनाखाली विकासाच्या दीर्घकालीन नियोजनावर भर देत, प्रभागाचा सर्वांगीण विकास साधण्याचा त्यांचा स्पष्ट दृष्टिकोन मतदारांना भावत आहे.
स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, “आशुतोष दादांच्या नेतृत्वाखाली शहराचा चेहरामोहरा बदलतो आहे. त्याच विकासाच्या विचारधारेतून काम करणारे प्रतिनिधी म्हणून सोनम त्रिभुवन व शुभम काळे यांच्याकडे आम्ही आशेने पाहतो आहोत.” त्यामुळे विकासाची पावती म्हणून या दोघांनाही मोठ्या विश्वासाने संधी देण्याची तयारी मतदारांमध्ये दिसून येत आहे.
एकूणच प्रभाग क्रमांक ११ मध्ये विकास, विश्वास आणि दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व या त्रिसूत्रीवर आधारित राजकारणाला बळ मिळत असून, त्याचा थेट फायदा सोनम त्रिभुवन व शुभम काळे यांना मिळताना दिसत आहे



