कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १२ मध्ये विकासाभिमुख व समाजाभिमुख नेतृत्वाला नागरिकांचा ठोस पाठिंबा मिळताना दिसत आहे. विजया आंग्रे व हाजी मेहमूद मनवरभाई सय्यद यांनी सातत्याने केलेल्या समाजकार्यामुळे आणि प्रभागाच्या विकासासाठी घेतलेल्या पुढाकारामुळे मतदारांमध्ये त्यांच्याविषयी विश्वास निर्माण झाला आहे.
प्रभागातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, नागरी सुविधा तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी या दोघांनी कायम सक्रिय भूमिका घेतली आहे. कोणताही भेदभाव न करता सर्व समाजघटकांना सोबत घेऊन काम करण्याची त्यांची कार्यपद्धती नागरिकांना भावणारी ठरत आहे.
या पार्श्वभूमीवर आमदार आशुतोष दादा काळे यांनीही विजया आंग्रे व हाजी मेहमूद मनवरभाई सय्यद यांच्या समाजकार्याची आणि विकासासाठी असलेल्या प्रामाणिक भूमिकेची जाहीर प्रशंसा केली आहे. लोकांशी थेट संवाद साधून प्रश्न सोडवणारे नेतृत्व प्रभागाच्या सर्वांगीण विकासाला चालना देते, असे मत त्यांनी व्यक्त केले.
त्यामुळे प्रभाग क्रमांक १२ मध्ये विकास, विश्वास आणि समाजकार्याच्या जोरावर विजया आंग्रे व हाजी मेहमूद मनवरभाई सय्यद यांना नागरिकांचा सकारात्मक कौल मिळताना दिसत असून, निवडणुकीत त्यांचा प्रभाव अधिक मजबूत होत असल्याची चर्चा मतदारांमध्ये सुरू आहे.



