कोल्हेंच्या कुटील डावपेचांना बळी पडू नका. कोपरगावातील अफवांना आ. आशुतोषदादा काळे यांची ठाम प्रतिक्रीया – “अफवांवर विश्वास ठेवू नका, मताधिक्याने विजयी होऊ”

कोपरगाव नगरपरिषद निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर प्रचाराचा जोर वाढत असतानाच, व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांना मिळत असलेला प्रतिसाद बघून पराभव समोर दिसत असलेल्या कोल्हे गटाकडून “कोल्हे पार्टीने काळेंना विधानसभा दिली, आता ते आम्हाला नगरपालिका देतील” अशा प्रकारच्या अफवा पसरवल्या जात आहेत. यावर आमदार मा. आशुतोषदादा काळे यांनी सोशल मिडियावरून नागरिकांना आवाहन केलं आहे की, “या प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नका. हे केवळ मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे डावपेच आहेत.”

आमदार आशुतोष काळे यांनी स्पष्ट केलं की, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार ओमप्रकाश तथा काका कोयटे आणि सर्व नगरसेवक उमेदवारांचा प्रचार जनतेच्या जोरावर सुरू असून, नागरिकांचा खंबीर पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे काही लोकांना पराभव स्पष्ट दिसत असल्याने अशा अफवा पसरवून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

“आपल्या सर्वांच्या एकतेच्या बळावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय निश्चित आहे. विकासाच्या मार्गावर कोपरगावाला पुढे न्यायचं आहे,” असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!