विवेक कोल्हेंच हे काय चाललंय? CNG प्रकल्पात कामगाराचा मृत्यू, पत्रकारांना दमदाटी?

a-worker-died-at-the-cng-plant kopargaon

a worker died-at the cng plant kopargaon कोपरगाव (विशेष प्रतिनिधी): कोपरगावच्या राजकीय पटलावर गेल्या चार दशकांपासून वर्चस्व गाजवणाऱ्या कोल्हे गटासाठी सध्याचा काळ अत्यंत कठीण ठरत आहे. एकीकडे सत्तेची गणिते बिघडत असतानाच दुसरीकडे एकापाठोपाठ एक अशा काही घटना घडत आहेत, ज्याची चर्चा आता संपूर्ण तालुक्यात ‘कोल्हे गटाला लागलेली साडेसाती’ या नावाने होत आहे. ४० वर्षांच्या सत्तेत कोपरगाव शहर ‘भकास’ केल्याचा आरोप होत असतानाच, आता कायद्याचा फेरा कोल्हे गटाभोवती आवळला जात असल्याचे चित्र आहे.

नाशिकचे ‘पार्सल’ आणि जनतेचा वाढता रोष,

आमदार आशुतोष काळे यांनी स्थानिक आणि जनसंपर्क असलेल्या काका कोयटे यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी देऊन कोपरगावकरांची मने जिंकली आहेत. याउलट, विवेक कोल्हे यांनी आपले नातेवाईक पराग संधान यांना नाशिकवरून कोपरगावच्या राजकारणात उतरवले आहे. मात्र, कोपरगावकरांनी “नाशिकचं पार्सल आम्हाला नको” म्हणत संधान यांना सुरुवातीलाच नाकारले आहे. ४० वर्षे सत्ता असूनही स्वतःचा स्थानिक उमेदवार देता न येणे, हीच कोल्हे गटाच्या राजकीय पनवतीची सुरुवात मानली जात आहे.

१. अमित शहांच्या दौऱ्यात रक्ताचे डाग: कामगाराचा दुर्दैवी मृत्यू

कोल्हे गटाच्या साडेसातीचा पहिला अंक केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कोपरगाव दौऱ्यावेळी पाहायला मिळाला. या भव्य कार्यक्रमाच्या तयारीसाठी पोल उभे करण्याचे काम सुरू असताना, अंडरग्राउंड करंट लागल्याने एका निष्पाप कामगाराला आपला जीव गमवावा लागला. एका मंगल कार्याच्या तयारीत अशा प्रकारे मृत्यूचे सावट पसरणे, हे कोल्हे गटासाठी अशुभ संकेत ठरले. गरिबाच्या रक्ताने माखलेली ही निवडणूक त्यांना जड जाणार, अशी चर्चा स्थानिकांमध्ये सुरू झाली.

२. न्यायालयाचा दणका आणि निवडणुकीचा खोळंबा

कोपरगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीत आपला पराभव स्पष्ट दिसत असल्याने कोल्हे गटाने राष्ट्रवादीच्या (काळे गट) उमेदवारांचे अर्ज बाद करण्यासाठी न्यायालयात धाव घेतली. खोटी कारणे देऊन लोकशाही प्रक्रियेत अडथळा आणण्याचा प्रयत्न कोल्हे गटाने केला. मात्र, न्यायालयाने त्यांचे सर्व दावे फेटाळून लावत त्यांना चपराक लगावली. ज्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोपरगावामध्ये येणार होते त्याचं दिवशी न्यायालयाचा निकाल कोल्हेंच्या विरोधात लागला. या न्यायालयीन वादामुळे निवडणूक पुढे ढकलली गेली, ज्याचा राग आता कोपरगावची जनता व्यक्त करत आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी शहराचा विकास आणि लोकशाही वेठीस धरणे, ही कोल्हे गटाची सर्वात मोठी चूक ठरली आहे.

३. विवेक कोल्हेंचे ‘इफको’ संचालकपद धोक्यात: नकुल कडूंचे आव्हान

दुसऱ्यांच्या अर्जांमधील चुका शोधणाऱ्या विवेक कोल्हे यांना आता स्वतःचे पद वाचवण्यासाठी धडपड करावी लागत आहे. निवडणुकीत खोटी माहिती दिल्याप्रकरणी नकुल कडू यांनी विवेक कोल्हे यांच्याविरोधात लढा पुकारला आहे. दुसऱ्यांच्या नामनिर्देशन पत्रात चुका शोधणाऱ्या विवेक कोल्हे यांनी स्वतःच इफकोच्या निवडणुकीत आपल्या नामनिर्देशन पत्रात खोटी माहिती भरल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या तक्रारीची गंभीर दखल घेत लवादाची (Tribunal) स्थापना करण्यात आली असून, पुढील सहा महिन्यांत विवेक कोल्हे यांचे ‘इफको’ मधील मानाचे संचालकपद जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. हे संकट म्हणजे कोल्हे गटाच्या साडेसातीचा परमोच्च बिंदू मानला जात आहे.

४. संजीवनी CNG प्रकल्पात मृत्यूचे तांडव

कोल्हे गटाच्या अधिपत्याखालील संजीवनी CNG प्रकल्पात सुरक्षिततेच्या नियमांना हरताळ फासल्याने अविनाश अण्णासाहेब डोखे (वय ४२) या कामगाराचा रंगकाम करताना मृत्यू झाला. या घटनेने कामगारांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण केला आहे. ४० वर्षांची सत्ता असूनही आपल्या कामगारांना सुरक्षित वातावरण देऊ न शकणाऱ्या कोल्हे गटाला आता कामगारांची तळतळाट लागल्याची भावना व्यक्त होत आहे.

४० वर्षांत विकास शून्य, फक्त शहर ‘भकास’!

ज्या कोपरगावने कोल्हे परिवाराला ४० वर्षे सत्ता दिली, त्या शहराची अवस्था आज एखाद्या गावापेक्षाही वाईट झाली आहे. रस्ते खड्ड्यात गेले आहेत, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे आणि कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. विकास करण्याऐवजी केवळ राजकारण आणि नातेवाईकांना उमेदवारी देण्यात धन्यता मानल्यामुळेच कोपरगावकरांनी आता कोल्हे गटाला कायमची ‘पनवती’ लावण्याचे ठरवले आहे.

थोडक्यात सांगायचे तर: अमित शहांच्या सभेतील मृत्यू, न्यायालयातील हार, स्वतःचे पद जाण्याची भीती आणि कामगारांचे जाणारे बळी— या सर्व घटना ही केवळ योगायोग नसून कोल्हे गटाला लागलेली ‘राजकीय साडेसाती’ आहे. कोपरगावची जनता आता या साडेसातीतून शहराला मुक्त करण्यासाठी सज्ज झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!