प्रभाग क्रमांक १० मधून तुषार गलांडे व माधवी वाकचौरे यांना विकासाची पावती; आशुतोष दादा काळे यांच्या दूरदृष्टीच्या नेतृत्वावर जनतेची मोहर

कोपरगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक दहा मध्ये विकास, जनसेवा आणि दूरदृष्टी असलेले नेतृत्व या मुद्द्यांवर नागरिकांनी स्पष्ट भूमिका घेतल्याचे चित्र दिसून येत आहे. आमदार आशुतोष दादा काळे यांच्या माध्यमातून प्रभागात राबविण्यात आलेल्या विविध विकास कामांची पावती म्हणून तुषार दादासाहेब गलांडे व माधवी राजेंद्र वाकचौरे यांना नगरसेवक म्हणून स्वीकारण्याचा कौल नागरिक देताना दिसत आहेत.

गेल्या काही वर्षांत प्रभाग क्रमांक दहामध्ये रस्ते, अंतर्गत गटार व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सुधारणा, वीज व स्वच्छता विषयक कामे तसेच नागरी मूलभूत सुविधा बळकट करण्यासाठी आमदार आशुतोष दादा काळे यांच्या नेतृत्वाखाली ठोस आणि परिणामकारक विकास झाला आहे. या विकास कामांमुळे प्रभागातील नागरिकांचे दैनंदिन जीवन अधिक सुकर झाले असून, त्याचा थेट लाभ सामान्य नागरिकांना मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.

या विकास प्रक्रियेत तुषार दादासाहेब गलांडे व माधवी राजेंद्र वाकचौरे यांनी सातत्याने नागरिकांशी संवाद ठेवत त्यांच्या अडचणी, समस्या आणि गरजा प्रशासनापर्यंत पोहोचवण्याची महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. समाजकार्याची पार्श्वभूमी, स्वच्छ प्रतिमा आणि सर्वसामान्यांशी असलेली जवळीक यामुळे दोघांनाही प्रभागात व्यापक पाठिंबा मिळत आहे.

स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, केवळ आश्वासनांवर नाही तर प्रत्यक्ष कामावर विश्वास ठेवणारे नेतृत्व म्हणून आमदार आशुतोष दादा काळे यांची ओळख निर्माण झाली असून, त्याच विकासात्मक दृष्टिकोनाची पुढची पिढी म्हणून तुषार गलांडे व माधवी वाकचौरे यांच्याकडे पाहिले जात आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक दहा मधून या दोघांना नगरसेवक म्हणून निवडून देऊन विकासाच्या या प्रवाहाला अधिक गती देण्याचा निर्धार नागरिक करत असल्याचे चित्र सध्या स्पष्टपणे दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!