कोपरगाव नगरपालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 15 मध्ये मतदारांचा कल स्पष्टपणे दिसून येत आहे. प्रभागातील नागरिकांनी स्वप्नाली वैभव कानडे व विनोद साहेबराव नाईकवाडे यांनाच नगरसेवक म्हणून निवडून देण्याचा ठाम मानस व्यक्त केला आहे.
प्रभागातील मूलभूत प्रश्न, नागरी सुविधा, पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता व दैनंदिन समस्यांबाबत सातत्याने जनतेशी संपर्क ठेवत दोन्ही उमेदवारांनी विश्वासार्ह भूमिका निभावली आहे. त्यांच्या सामाजिक बांधिलकीला आणि प्रामाणिक कार्यपद्धतीला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.
तसेच आमदार आशुतोष दादा काळे यांच्या नेतृत्वाखाली प्रभागात झालेल्या विविध विकासकामांमुळे जनतेचा विश्वास अधिक दृढ झाला असून, त्या विकासाला पुढे नेण्यासाठी सक्षम आणि लोकाभिमुख प्रतिनिधी म्हणून स्वप्नाली कानडे व विनोद नाईकवाडे यांच्याकडे पाहिले जात आहे.
सध्या प्रभाग क्रमांक 15 मध्ये प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, “यांनाच नगरसेवक करायचं” अशी एकमुखी भावना दिसून येत आहे. त्यामुळे येत्या निकालात या जोडीचा विजय निश्चित मानला जात आहे.



