प्रभाग क्रमांक ५ मध्ये समाजकार्यातून विश्वास; अमित आगलावे व शोभा गायकर यांचा विजय निश्चित

कोपरगाव नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक पाचमध्ये अमित चंद्रकांत आगलावे व शोभा अशोक गायकर यांनी केलेल्या सातत्यपूर्ण समाजकार्यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. आरोग्य, सेवा आणि जनहिताच्या विविध उपक्रमांमुळे दोघांनाही प्रभागातील सर्वसामान्य नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून त्यांच्या विजयाची शक्यता शंभर टक्के असल्याची चर्चा प्रभागात रंगली आहे.

प्रभागातील नागरिकांच्या दैनंदिन समस्या समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी प्रत्यक्ष मैदानात उतरून काम करण्याची भूमिका आगलावे व गायकर यांनी कायम ठेवली आहे. गरजू कुटुंबांना मदत, आरोग्य शिबिरे, स्वच्छता मोहिमा तसेच सामाजिक उपक्रमांमधील सक्रिय सहभागामुळे त्यांची प्रतिमा ‘काम करणारे लोकप्रतिनिधी’ अशी ठामपणे उभी राहिली आहे.

“निवडणूक आली कीच नव्हे, तर नेहमीच आमच्यासोबत उभे राहणारे हेच प्रतिनिधी आम्हाला हवेत,” अशी भावना अनेक नागरिक व्यक्त करत आहेत. त्यामुळे प्रभाग क्रमांक पाचमध्ये मतदारांचा कौल स्पष्टपणे अमित चंद्रकांत आगलावे व शोभा अशोक गायकर यांच्या बाजूने झुकलेला दिसत असून, येत्या निवडणुकीत त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!