कोपरगाव :
प्रभाग क्रमांक चारमध्ये रंजना रमेश गवळी व हनुमंत पांडुरंग नरोडे यांनी गेल्या काळात केलेल्या सातत्यपूर्ण जनसेवेच्या कामांना नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. सामान्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी कायम उपलब्ध राहणारे हे दोन्ही उमेदवार आज प्रभागातील लोकांचा विश्वास संपादन करताना दिसत आहेत.
रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, ड्रेनेज, विद्युत सुविधा यांसह दैनंदिन नागरी प्रश्नांवर त्यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला. केवळ आश्वासनांपुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष कामांवर भर देण्याची भूमिका त्यांनी घेतली असल्याने नागरिकांमध्ये समाधानाची भावना आहे.
या सर्व विकासकामांना आमदार आशुतोष दादांनी दिलेली ठोस साथ निर्णायक ठरत आहे. आमदार आशुतोष दादांच्या माध्यमातून प्रभागात निधी उपलब्ध करून देत अनेक रखडलेली कामे मार्गी लागली. त्यामुळे “काम करणारे आणि प्रश्न सोडवणारे प्रतिनिधी” अशी ओळख रंजना रमेश गवळी व हनुमंत पांडुरंग नरोडे यांची निर्माण झाली आहे.
प्रभागातील नागरिकांशी थेट संवाद, सातत्यपूर्ण जनसंपर्क आणि विकासाला प्राधान्य देणारी भूमिका यामुळे या दोन्ही उमेदवारांना सर्वसामान्यांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. सध्या प्रभाग क्रमांक चारमध्ये सकारात्मक वातावरण असून, जनतेचा कौल स्पष्टपणे रंजना रमेश गवळी व हनुमंत पांडुरंग नरोडे यांच्या बाजूने झुकताना दिसत आहे.
एकूणच जनसेवेचे काम, आमदार आशुतोष दादांची भक्कम साथ आणि नागरिकांचा विश्वास या त्रिसूत्रीमुळे प्रभाग क्रमांक चारमधून रंजना रमेश गवळी व हनुमंत पांडुरंग नरोडे यांचा विजय निश्चित असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे.



