प्रभाग क्रमांक 14 मध्ये बदलाची लाट; वाल्मीक जयसिंग लहिरे व माधुरी मच्छिंद्र शिंदे यांच्या ऐतिहासिक विजयावर जनता व्यक्त करतेय ठाम विश्वास

कोपरगाव नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 14 मध्ये राजकीय वातावरण पूर्णपणे बदललेले दिसत आहे. वाल्मीक जयसिंग लहिरे व माधुरी मच्छिंद्र शिंदे यांच्या बाजूने जनतेचा कौल ठामपणे झुकत असून, त्यांच्या ऐतिहासिक विजयाबाबत जनता उघडपणे विश्वास व्यक्त करताना दिसत आहे.

सातत्यपूर्ण जनसंपर्क, स्थानिक प्रश्नांवरील ठोस भूमिका आणि सामाजिक बांधिलकीमुळे लहिरे–शिंदे जोडीला प्रभागातील सर्व स्तरांतून भरघोस प्रतिसाद मिळत आहे. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य व मूलभूत नागरी सुविधांसाठी त्यांनी मांडलेला विकासाचा स्पष्ट अजेंडा मतदारांना भावत आहे.

प्रभागातील विविध भागांतून मिळणारा उत्स्फूर्त पाठिंबा पाहता नागरिक “बदल हवा आहे आणि तोच बदल लहिरे–शिंदे यांच्या माध्यमातून होणार” अशी भावना व्यक्त करत आहेत. प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यातही मिळणारा प्रतिसाद पाहता जनता त्यांना डोक्यावर घेताना दिसत असून, विजयाची लाट अधिकच मजबूत होत चालली आहे.

एकूणच प्रभाग क्रमांक 14 मध्ये निर्माण झालेले सकारात्मक वातावरण, वाढता जनविश्वास आणि ठाम जनसमर्थन पाहता वाल्मीक जयसिंग लहिरे व माधुरी मच्छिंद्र शिंदे यांचा विजय निश्चितच नव्हे तर ऐतिहासिक ठरणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!